बुडालेल्या वारकऱ्याचा मृतदेह मिळाला
नीरा नरसिंहपूर, ता. ३ : सराटी (ता. इंदापूर) येथे नीरा नदीत बुडालेला तरुण वारकरी गोविंद अंकुश फोके (वय १६) याचा मृतदेह ३५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक १२ मधील झेरपी (ता. अंबड, जि. जालना) येथील गोविंद फोके हा तरुण वारकरी नीरा नदीच्या पात्रात अंघोळीवेळी भोवऱ्यात सापडल्याने १ जून रोजी बुडाला होता. त्याला वाचवण्याचा प्रयत्न होमगार्ड राहुल ठोंबरे यांनी केले होते. त्यानंतर एनडीआरएफच्या दोन पथकातील चौदा जवानांनी नीरा नदीत शोधकार्य सुरू केले. अखेर २ जून रोजी सायंकाळी पाच वाजता अकलूजच्या अकलाई मंदिरालगत नदीकाठावर मृतदेह तरंगताना आढळून आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.