शेकडो किलो मटण, चिकन, अंडी, मासळीवर ताव

शेकडो किलो मटण, चिकन, अंडी, मासळीवर ताव

Published on

नीरा नरसिंहपूर, ता. २४ : आषाढ महिन्याची सांगता गुरुवारी (ता. २४) होत असल्याने अनेकजण या दिवशी मांसाहारी खाणे टाळतात. त्यामुळे खवय्यांनी बुधवारीच (ता. २३) बेत आखला होता. परीसरातील गावांत गटारी साजरी करत अनेकांनी पार्टीचा बेत आखत शेकडो किलो मटण, चिकन, अंडी व मासळीवर ताव मारला.
श्रावण महिन्याचा प्रारंभ शुक्रवारी (ता. २५) होणार आहे. श्रावण महिन्यानंतर गणेशोत्सवाला सुरवात होते. त्यानंतर नवरात्रोत्सवातही मांसाहारी पदार्थ वर्ज्य असतात. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला खवय्यांच्या भाषेत गटारी असे संबोधिले जाते. मात्र, यंदा आषाढ महिन्याची सांगता गुरुवारी होणार आहे. गुरुवारी शक्यतो मांसाहारी पदार्थांचे सेवन वर्ज्य मानले जाते.
मटण, मासळी आणि चिकन खरेदीसाठी बाजारात सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. पिंपरी बुद्रूक, बावडा, अकलूज, गणेशवाडीसह परीसरातील बाजारांमध्येही खरेदीला उधाण आले होते. बावडा, पिंपरी बुद्रूक येथे भीमा व नीरा नदीतून आणलेली रहू, कतला, चिलापी अशी शेकडो किलो मासळीची आवक झाली होती. खवय्यांची राहू, कतला, चिलापी, वाम यांना सर्वाधिक मागणी होती, अशी माहिती व्यापारी दत्तात्रेय पतुले, अशोक रजपूत यांनी दिली.
चिकन, मटणालाही हॉटेल चालकांकडून मोठी मागणी होती. बावडा, पिंपरी बुद्रूक, अकलूज परिसरातून १,५०० ते २,००० बोकड-मेंढ्या खरेदी करण्यात आल्या होत्या. मटण दुकानदार मुबारक शेख यांनी सांगितले की, विक्रेत्यांनी अकलूजसह शेजारील जिल्ह्यांतून मटणासाठी बोकड, गावरान कोंबड्या खरेदी केली होती. चिकनलाही जोरदार मागणी असून, सुमारे ३०० ते ५०० किलोची विक्री परिसरात झाल्याचे अस्लम मुलाणी यांनी सांगितले. अंडी मात्र स्वस्त झाली असून, शेकड्याला ७०० रुपयांचा दर होता.

मटण, मासळी, चिकनचे किलोचे दर
मटण.....७८० ते ८०० रुपये
चिकन.... २०० रुपये
चिलापी... १३० ते १५० रुपये
रव.... १८० ते २२० रुपये
कतला..... २०० ते २२० रुपये
गावरान कोंबडा...५०० ते ७०० रुपये
गावरान अंडी...७०० ते १००० शेकडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com