बोडके यांनी पिकविलेले आले इंदापुरच्या कृषिप्रदशर्नात प्रथम

बोडके यांनी पिकविलेले आले इंदापुरच्या कृषिप्रदशर्नात प्रथम

Published on

नीरा नरसिंहपूर, ता.४ : पिंपरी बुद्रुक (ता.इंदापूर) येथील प्रगतशील शेतकरी केशव बोडके यांनी पेरूच्या झाडांमध्ये आंतरपीक म्हणून सेंद्रिय पद्धतीचे आल्याची लागवड केली. त्याची विक्री औरंगाबाद येथे केली आहे. त्यास ३६ रुपये प्रतिकिलो एवढा बाजारभाव मिळाला. मात्र, नफा न मिळता केवळ उत्पादन खर्च निघाला. परंतु इंदापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या कृषी प्रदर्शनात सेंद्रिय आल्याने प्रथम क्रमांक पटकविला, अशी माहिती बोडके यांनी दिली.
पिंपरी बुद्रुक येथे बावडा नरसिंहपूर राज्य मार्गालगत त्यांनी एक एकर आल्याची लागवड केली. पुसेगाव (जि. सातारा) येथून सातारी वाणाचे एक टन आले बेणे आणले. प्रतिकिलो १५० रुपये दराने दीड लाखाचे किमतीचे बेणे आणले व आंतरपीक म्हणून लागवड केली. यासाठी खत म्हणून निंबोळी पेंड, करंज पेंड, बोनमिल, उडीद व कांद्याचा पाला पाचोळा, विशेष जिवामृत स्लरी खत व बेडला दोन वेळेस मातीची भर लावणे, ठिबक सिंचन, खुरपणी, जैविक बुरशीनाशके, कीटकनाशक अशा सेंद्रिय व जैविक घटकांचा वापर करून एकरी १५ टन उत्पन्न घेतले. एक वर्षात एका एकरात विक्रमी १५ टनांचे उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयोग केशव बोडके यांनी केला आहे.
दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर येथील कार्यक्रमात सेंद्रिय शेतीबद्दल प्रगतशील शेतकरी प्राजक्ता व केशव बोडके या दांपत्याचा सन्मानचिन्ह देवून सत्कार केला.

05026

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com