पुणे
आयुष्मान भारतच्या अध्यक्षपदी गायकवाड
नीरा नरसिंहपूर, ता. ६ ः इंदापूर तालूका भाजप आयुष्मान भारतच्या अध्यक्षपदी नागेश गायकवाड यांची नियुक्ती झाली. पुणे जिल्हा दक्षिण भाजप अध्यक्ष शेखर वढणे यांच्या हस्ते गायकवाड यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, इंदापूर तालुकाध्यक्ष राम आसबे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार ॲड. राहुल कुल यांच्या आदेशाने गायकवाड यांची निवड करण्यात आले.
05116