

नीरा नरसिंहपूर, ता. २९ : ‘‘कसली दिवाळी आणि कसलं काय? दिवसभर कष्ट केले तरच भाकरी मिळते. त्यामुळे दिवाळी काय, हे आम्हाला माहीतच नाही. दिवाळी आमच्यासारख्या सामान्यांसाठी नसते. ती असते फक्त पैसेवाल्यांची आहेत,’’ अशी खंत ऊसतोड मजूर महिलांनी व्यक्त केली.
इंदापूर तालुक्यात पोटाची खळगी भरण्यासाठी धुळे, नंदुरबार, नगर, यवतमाळ, वाशीम, आष्टी, पाटोदा, गेवराई, जळगाव, बीड, माजलगाव बरोबरच कर्नाटक, मध्यप्रदेश मधूनही ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. त्यांची यंदाची दिवाळी उसाच्या फडातच काम करून साजरी होताना दिसत आहे. एकीकडे घरोघरी आकाश कंदिल व विद्युत रोषणाईचा झगमगाट, फटाक्यांची आतषबाजी, घरी केलेल्या खमंग खाद्य पदार्थांचा सुवास ओसंडून वाहत होता. तर दुसरीकडे मात्र ऊसतोड मजुरांचा दररोजचा दिनक्रमाचा विरोधाभासी चित्र पाहून मन हेलावून जाते.
यावर्षी गळीत हंगाम उद्यापासून सुरू होणार आहे. इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर, कर्मयोगी शंकरराव पाटील बिजवडी, बारामती ॲग्रो शेटफळगढे, सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर, विठ्ठल सहकारी गंगामाईनगर या कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यामुळे ऊस पट्ट्यातील चांगल्या प्रतीचा ऊस तालुक्यातील किंवा पर जिल्ह्यातील कारखाने सध्यातरी उचलत आहेत.
यावर्षी पावसाच्या दमदार हजेरी लावल्याने पुरसदृष्य परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे साखर कारखान्यांचा हंगाम थोड्या कालावधीचा असल्यामुळे प्रथमच थोडे थोडकेच ऊसतोड मजूर मुलाबाळांसह दाखल झाले आहेत. त्यामुळे आलेल्या मजुरांना दिवाळी उसाच्या फडात साजरी करावी लागत आहे.
संघर्ष पाचवीलाच पूजलेला
ऊसतोड मजूर ऊन, पाऊस, वारा, थंडी या कशाचीही पर्वा न करता कष्टाचे व कसरतीचे काम करत आहेत. सर्व आटापिटा घेतलेली उचल फेडण्यासाठीच असतो. या ऊसतोड कामगारांचा संपूर्ण दिवस उसाच्या फडात जातो. पोटासाठीचा संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजले आहे, अशी भावना ऊसतोड मजुरांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. तसेच दररोजच्या मीठ, मिरची, भाकरीचा आस्वाद हा दिवाळीच्या गोड पदार्थापेक्षाही कितीतरी अधिक पटीने स्वादिष्ट लागत असतो, असेही मजुरांनी सांगितले.
05163
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.