नीरा, भीमा नदीवरील बंधारे तुडुंब
नीरा नरसिंहपूर, ता. २ ः पावसाळा संपल्याने उजनी धरणातून सोडण्यात येत असलेले भीमा नदीतील पाणी बंद झाले आहे. तर नीरा नदीचेही पाणी यापूर्वीच बंद झाले आहे. त्यामुळे भीमा नदीवरील तीन व नीरा नदीवरील दहापेक्षा अधिक बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी अडवण्यात आले आहे. तसेच, काही बंधारे दुरुस्तीअभावी रिकामे राहणार असल्याने शेतकऱ्यांसमोर पाणी टंचाईचे संकट उभा राहणार आहे. नादुरुस्त बंधारे दुरुस्त करून पाण्याने भरण्याची मागणी शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.
भीमा नदीवरील भाटनिमगाव, टणू, नरसिंहपूर, तर नीरा नदीवरील संगम, ओझरे, लुमेवाडी, अकलाई, सराटी, निरनीमगाव, भगतवाडी, निरवांगी, खोरोची आदी बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी अडविले आहे. जलसंपदा विभागाच्या नियमानुसार प्रतिवर्षी पावसाळ्याच्या अखेरीस १८ ऑक्टोबरच्या दरम्यान नदीवरील सर्व बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी अडवण्याचा नियम आहे. मात्र, नोव्हेंबरचा पंधरवडा संपत आला असताना ढापे टाकली आहेत. त्यामुळे पाणी वाहून गेल्याने अनेक बंधाऱ्यांत कमी पाणी अडवले गेल्याने ते लवकरच रिकामे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी नीरा नदीवरील गिरवी व ओझरे बंधाऱ्याची अतिवृष्टीच्या पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले. त्यामुळे दोन वर्ष बंधाऱ्यात पाणी अडवण्यात आले नसल्याने पाण्याअभावी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चालू वर्षी पाऊस काळ चांगला झाला असून, पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. मात्र, गिरवी बंधारा पुन्हा पाण्याच्या रेट्यामुळे फुटल्याने तो तातडीने दुरुस्त करून पाणी सोडून ढापे टाकून पाणी अडवणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी यामध्ये लक्ष घालून नीरा व भीमा नद्या वरील बंधाऱ्यांना ढापे टाकण्याचे व बंधारे दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
05239
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

