नीरा नदीतील पाण्यावर सराटी येथे देखावा
नीरा नरसिंहपूर, ता. १९ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सराटी (ता. इंदापूर) येथे नीरा नदीत छत्रपतींचा तरंगता देखावा साकारण्यात आला होता. हा देखावा पाहण्यासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली होती.
सूरज कुंभार व रोहित पाटसकर या दोन शिवप्रेमींनी स्वखर्चातून साडेतीन लाख रुपये खर्च करून नीरा नदीत छत्रपतींचा तरंगता देखावा सादर केला. हा देखावा तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला असल्याचे सूरज कुंभार यांनी सांगितले, तर शिवरायांचा इतिहास पाहून शिवप्रेमी जागृत व्हावा, याच उद्देशाने देखावा तयार केल्याचे रोहित पाटसकर यांनी सांगितले. हा तरंगता देखावा करण्यासाठी जवळपास ३५ बॅरलचा वापर केला आहे. त्यावरील हत्तीवर शिवरायांचा पुतळा, सोबतीस हातात भाला घेऊन उभे राहिलेले दोन मावळे असा देखावा केला आहे. देखावा जवळून पाहण्यासाठी मोफत बोटीची सोय केली असून, त्यांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफची नऊ जणांची टीम कार्यरत ठेवली होती.
05354, 05355
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

