नीरा नरसिंहपूरला नवरात्र उत्सवाची सांगता

नीरा नरसिंहपूरला नवरात्र उत्सवाची सांगता
Published on

नीरा नरसिंहपूर, ता. ४ : श्री लक्ष्मी नृसिंह जयंती व नवरात्र उत्सव उत्साहात झाला. अकरा दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले. अंकुश महाराज रणखांबे यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दरम्यानच्या काळात दररोज सकाळी सनई चौघडा वादन, विष्णुसहस्त्रनाम, पंचामृत, विविध जिल्ह्यातून आलेले भजनी मंडळ, प्रवचन, नादब्रह्म, भक्ती संगीत, कीर्तन, अभंगवाणी, सुगम संगीत, भावगंध संगीत, शहनाई वादन, रंगसप्तक, कुचीपुडी नृत्य आदि भक्तीमय सेवा सादर झाली. तर नृसिंह जयंती दिवशी समर्थभक्त राघवेंद्र देशपांडे (डोंबवली) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला.
तसेच देवस्थानच्या वतीने आरोग्य, डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये डोळे व दंत चिकित्सा करण्यात आली. तसेच शिबीरात मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. भाविक, ग्रामस्थांच्या वतीने श्रींची पालखी मिरवणूक गावातून विविध पारंपरिक वाद्य, लेझीम व रंगीबेरंगी फटाक्यांची अताषबाजी, पारंपरिक खेळ लाठीकाठी आणि विविध खेळांनी मिरवणूक पार पडली. रणखांबे यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com