पिंपळगाव जोगा परिसराला अवकाळी पावसाने झोडपले

पिंपळगाव जोगा परिसराला अवकाळी पावसाने झोडपले

Published on

ओतूर, ता. १३ : पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) परिसराला रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. यामध्ये अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर दोन ठिकाणी झाडे कोसळली. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले.
ओतूर, उदापूर, डिंगोरे, पिंपळगाव जोगा, कोळवाडी, मढ परिसरात सकाळपासून ढगाळ हवामान होते. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. अनेक शेतकऱ्यांची कांद्यांची काढणी चालू होती, तर काहींनी कांदे काढून शेतात अरणी केल्या होत्या. मात्र दुपारी ४ वाजता अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला. त्यामुळे अनेकांचा कांदा पावसात भिजला. तर अन्य पिकांनाही फटका बसला.
तर पिंपळगाव जोगा ते कोळवाडी गावच्या दरम्यान अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर निलगिरीचे मोठे झाड उन्मळून पडले. तसेच पुढे वाटखळे गावच्या हद्दीतही महामार्गावर मोठे बाभळीचे झाड पडून इतर राडारोडा आला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
याबाबतची माहिती ओतूर पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शामसुंदर जायभाय, किशोर बर्डे, होमगार्ड शुभम काशिद, गोरक्षनाथ गवारी यांनी झाडे जेसीबीच्या सहाय्याने बाजूला केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com