डुंबरवाडी येथे करिअर मार्गदर्शन

डुंबरवाडी येथे करिअर मार्गदर्शन
Published on

ओतूर, ता. १८ : ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये गुरुवारी (ता. १७) करिअर मार्गदर्शन या विषयावर कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे उद्योगमित्र बिजवर्स फाउंडेशन पुणेचे विजय पवार, सीईओ पर्पल हॅट इन्स्टिट्यूट नाशिकचे प्रा. मंगेश खैरे, संगणक विभागप्रमुख डॉ. सुनील खताळ, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. नीता बाणखेले, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. सचिन जाधव. त्याचप्रमाणे कार्यशाळा समन्वयक डॉ. मोनिका रोकडे, प्रा. काजल फापाळे, प्रा. सिद्धेश पानसरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये पवार यांनी तंत्रज्ञानाने झपाट्याने बदलत असलेल्या युगात विद्यार्थ्यांनी कोणत्या कौशल्यांचा विकास करावा, विविध उद्योग आणि नवीन व्यवसायामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या संधी कशा साधाव्या तसेच आत्मविश्‍वास व योग्य दिशेने प्रयत्न कसे करावे? यावर सखोल माहिती दिली.
कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी संघाने विशेष प्रयत्न केले. हेमर्षी महाले या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com