गावरान खजूर नामशेष होण्याच्या मार्गावर

गावरान खजूर नामशेष होण्याच्या मार्गावर

Published on

ओतूर, ता.१५ : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्टयात गावरान खजूर आणि रानमेवा म्हणून ओळखली जाणारी शिंदाडीची फळे व त्यांची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या काही वर्षांपासून या झाडांपासून मिळणारी ताडी व नीरा या पेयांच्या हव्यासापायी त्यांची संख्या घटत आहे. शासनाने वेळीच खबरदारी घेतली नाही तर भविष्यात ही झाडे नष्ट होतील, अशी भीती वृक्षप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या उदापूर, डिंगोरे, कोळवाडी, पिंपळगाव जोगा, मढ, खिरेश्वर, खुबी, करंजाळे, संगणोरे, पारगाव, सितेवाडी या भागात व पुष्पावती व मांडवी नदी तीरी शिंदाडीची झाडे मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत होती. मात्र, दिवसेंदिवस या झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आता ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शिंदडीच्या झाडाला मधूर व गोड आणि काहीशी तुरट चवीची खजुरासारखीच पण त्या पेक्षा आकाराने थोडीशी लहान फळे येतात. तसेच या झाडाच्या फांद्यांपासून घर साफ करणारी झाडू बनवली जाते. यासाठी उदापूर परिसरात शिंदाडीची लाखो झाडे अस्तित्वात होती.ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

येथे आढळतात ही झाडे
प्रामुख्याने नदीकाठी,
ओढ्यावर,
शेताच्या बांधावर

यामुळे होऊ लागले झाड खराब
१. शिंदाडीच्या झाडापासून नीरा व ताडीची निर्मिती केली जाऊ लागली.
२. शिंदाडीच्या झाडाला जेथून झावळ्या फांद्या फुटतात तेथे काप केला जातो.
३. कापलेल्याठिकाणी मडके लावून त्यातून येणारा रस, जो प्रथम नीरा व नंतर ताडी म्हणून विकला जातो.
४. झाडाला लावलेले मडके दररोज काढून केलेला काप मोठा करून ते मडके पुन्हा ताडी मिळविली जाते.
५. काही कालावधीनंतर केलेला काप मोठा होऊन झाड वाळून खराब होऊ लागते.

तरुण पिढी व्यसनाधीन झाली
ताडी व नरा विक्रीचे परवाने शासनाकडूनच मिळू लागले आणि वेगवेगळ्या भागातील शिंदाडीच्या झाडांची ताडी काढण्यासाठी लिलाव पध्दतीने शासनाकडून विक्री केली जाऊ लागली. यामुळे ज्याच्या मालकीच्या जागेत, बांधावर झाड आहे त्या व्यक्तीस एका झाडामागे शंभर ते दीडशे रुपये दिले जात आहेत. या सर्व व्यवहारात ताडी विक्री करणारे लोक श्रीमंत झाले आहेत. मात्र, शेतकऱ्यांची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. शिवाय तरुण पिढी व्यसनाधीन झाली असल्याचे दिसून येत आहे.

मानवाच्या स्वार्थासाठी एका बहुउपयोगी असणाऱ्या शिंदाडीच्या झाडाचे अस्तित्वच धोक्यात आले असून सृष्टीतील एक वृक्ष प्रजाती नष्ट होण्याच्या टप्प्यावर आहे. परंतु कोणाचेही याकडे लक्ष नाही. तरी वृक्षमित्र, विविध संस्था, वृक्षप्रेमी संघटना व वनविभाग यांनी पुढाकार घेऊन शिंदाडीच्या झाडांच्या संवर्धनासाठी काम करावे आणि पर्यावरण संतुलीत ठेवण्यासाठी मदत करावी.
- संतोष वाळेकर, ग्रीनव्हज फाउंडेशन,ओतूर


00289, 00291

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com