ओतूरच्या चैतन्य महाराज पालखीचे प्रस्थान

ओतूरच्या चैतन्य महाराज पालखीचे प्रस्थान

Published on

ओतूर, ता. १६ : ‘ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरी’च्या मंत्रघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज यांचे गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पायी पालखीचे ओतूर (ता. जुन्नर) येथून पंढरपूरला आषाढी वारीसाठी रविवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता प्रस्थान झाले.
याबाबत चैतन्य महाराज प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष आत्माराम गाढवे, सचिव अनिल तांबे म्हणाले, ‘‘संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे गुरू बाबाजी चैतन्य महाराजांची ओतूर येथे संजीवन समाधी आहे. यामुळे येथून जाणाऱ्या या पालखीला पंढरपूर पायी वारी सोहळ्यात मानाचे स्थान आहे. ओतूर ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू केलेल्या या पालखी सोहळ्याचे हे ६५ वे वर्ष आहे.’’
शनिवारी या पालखी सोहळ्यास सदगुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरापासून सुरूवात झाली. टाळ मृदंगाच्या गजरात व राम कृष्ण हरी या मंत्र घोषात पायी पालखी सोहळा निघाल्यानंतर ओतूर पोलिसांकडून सहायक पोलिस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी पोलिस ठाण्यासमोर पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर ओतूर शहराला नगर प्रदक्षिणा घालून नंतर पालखीचा पहिला मुक्काम ओतूर शहरातील मुख्य चौक पांढरी मारुती मंदिरात झाला.
रविवारी सकाळी शंकर डुंबरे यांनी सपत्नीक अभिषेक आणि पूजा केली. शांताराम महाराज वाकर यांना रथाला ओढण्याच्या बैलजोडीचा मान मिळाला आहे. ओतूर येथून पालखी प्रयाणावेळी मिरवणूक निघाली होती. यात महिलांच्या अंबीदुमाला (ता. संगमनेर) येथील जयमल्हार टाळ पथक आणि जुन्नर तालुक्यातील लेझीम पथकांनी या वर्षी मिरवणुकीत सहभाग घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली.
पालखी सोहळ्यात बाबाजी चैतन्य महाराज प्रासादिक भजन मंडळाचे संस्थापक महादेव तांबे, अध्यक्ष आत्माराम गाढवे, सचिव अनिल तांबे, उपाध्यक्ष रघुनाथ तांबे, ज्ञानेश्वर पानसरे, शांताराम महाराज वाकर, विलास घुले, शांताराम पानसरे, जे. आर. डुंबरे, गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव वैभव तांबे, गंगाराम महाराज डुंबरे, महेंद्र पानसरे, जयवंत डुंबरे, राजेंद्र डुंबरे, जितेंद्र डुंबरे, रोहिदास घुले, शांताराम पानसरे,अनिल डुंबरे, धनंजय डुंबरे, पाडुरंग ढोबळे, ज्ञानेश्‍वर पानसरे, उपसरपंच प्रशांत डुंबरे सहभागी झाले होते.
संपूर्ण गावात वातावरण भक्तीमय होऊन सर्वत्र रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष सुरु होता. पायी पालखी ओतूर, आळे, बेल्हा, पाडळी, लोणी मावळा, रांधे दरोडी फाटा, वडझिरे, पारनेर, पाणोली घाट, पिंपळनेर, राळेगण सिद्धी, ढवळगाव, उक्कडगाव, बेलवंडी, श्रीगोंदा, घोडेगाव, चांदगाव, टाकळी, जलालपूर, सिद्धटेक, बेर्डी, सिद्धटेक, बारडगाव, येसवडी, राशीन, कोर्टी, विहाळ, वीट, झरे, वांगी कविटगाव, कंदर, टेंभुर्णी, अरण, मोडलिंब, आष्टी, बाबळगाव मार्गे पालखी १९ दिवसांनी गुरुवारी (ता. ३) पंढरपूर येथे दाखल होणार आहे. पंढरपूर येथे पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी (ता. ९ जूलै) परतीचा प्रवास सुरु होणार आहे. गुरुवारी (ता. २४ जुलै) पालखीचे ओतूर येथील पांढरी मारुतीचे मंदिर येथे पुनरागमन होणार आहे. एकूणच हा वारकऱ्यांचा प्रवास ४१ दिवसांचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com