कोळवाडी आश्रमशाळेत विविध कार्यक्रम

कोळवाडी आश्रमशाळेत विविध कार्यक्रम

Published on

ओतूर, ता. २ : कोळवाडी (ता. जुन्नर) येथील शिवप्रेरणा संस्थेची आश्रम शाळेमध्ये रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्यावतीने डॉक्टर डे, सीए डे, फार्मर्स डे. निमित्ताने प्रगतशील शेतकरी व सेवाभावी डॉक्टर्स, नामांकित सी ए यांचा गुणगौरव करून सत्कार केला. तसेच आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये २८० मुला-मुलींची तपासणी करून त्यांच्याशरीरातील हिमोग्राम व थॅलसेमिया अशा दुर्लक्षित व गंभीर आजाराची एच बी इलेक्ट्रॉफोरसिस तपासणी मोफत केली. या आजरासंबंधी असणारे धोके व उपाय मार्गदर्शन माहिती रोटरी अध्यक्ष रोटेरीयन डॉ. उत्तम घोरपडे यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी रोटरीचे माजी अध्यक्ष ॲड. अरुण गाडेकर होते. रोटरी प्रोजेक्ट डायरेक्टर मंदाकिनी दांगट यांनी प्रास्ताविक केले.
६ वी ते १२ च्या मुलींना डॉ. हेमलता गुळवे यांनी लैंगिक शिक्षण तसेच आरोग्य विषयावर व्याख्यान दिले. तसेच डॉ. अर्चना सराईकर व कीर्ती घोरपडे यांनी आजारापासून कसे दूर रहायचे यावर मार्गदर्शन केले.
रक्त तपासणीसाठी सावकार साळवी व साक्षी घुले यांनी सहकार्य केले. सर्व रोटरी क्लब पदाधिकारी सचिव हनुमंत भंडारी, प्रोजेक्ट इन्चार्ज श्यामराव थोरात, पोलिस अधिकारी सुकाजी मुळे, रामभाऊ सातपुते, रोटरीचे उपाध्यक्ष बाळासाहेब ढमाले उपस्थित होते. अरुण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तसेच प्राचार्य सीताराम गायकर, मुख्याध्यापक गुलाब गावंदे सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com