चिल्हेवाडी धरणात 
मृतदेह आढळला

चिल्हेवाडी धरणात मृतदेह आढळला

Published on

ओतूर, ता. ५ : मुथाळणे (ता. जुन्नर) येथील महिला येसलठा येथील मांडवी नदी पात्रात बेपत्ता झाली होती. तीचा मृतदेह सहा दिवसांनी चिल्हेवाडी धरणात आढळून आला.
झुंबराबाई भाऊ बारे (वय अंदाजे ४७), असे या मृत महिलेचे नाव आहे. त्या सोमवारपासून (३० जून) बेपत्ता होत्या. त्यांचा शोध मांडवी नदीपात्रात स्थानिक नागरिक व जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य करीत होते. मात्र, भौगोलिक परिस्थिती व पाऊस नदीतील पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे शोध कार्यरत अडथळे निर्माण येत होते. अखेर शनिवारी दुपारी चिल्हेवाडी धरणाच्या जलाशयात या महिलेचा मृतदेह मिळाला. या शोधकार्यात शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य राजकुमार चव्हाण, धनंजय मिरगुंडे, महेंद्र नवले, मुदस्सर इनामदार, ओम बिडवई, आदित्य आचार्य, संदीप पारधी, सिद्धार्थ जाधव, रूपेश जगताप, सुदर्शन कांबळे, विजय वायाळ यांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com