मोबाईलचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या 
प्रगतीतील अडथळा : अकोलकर

मोबाईलचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील अडथळा : अकोलकर

Published on

ओतूर, ता. १४ : ‘‘आजच्या विज्ञान युगात मोबाईल गरजेचा असला तरीही विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या मार्गात तो मुख्य अडथळा ठरत आहे. मोबाईलचे अनेक दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे या कडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतीक अकोलकर यांनी केले.
ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित सरस्वती विद्यालय उदापूर येथे शनिवारी (ता. १२) इयत्ता पाचवी ते १० वीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा झाला. मेळाव्यानिमित्त बहुसंख्य पालक उपस्थित होते. त्यानंतर शिक्षक-पालक सहविचार सभेत अकोलकर बोलत होते.
शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना संस्कार आणि शिस्तीची गरज आहे. शिक्षक आणि पालक यांच्या एकत्र समन्वयातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांवर संस्कार होऊ शकतात. त्यासाठी पालकांनी सतत शाळा व शिक्षकांच्या संपर्कात असणे गरजेचे असल्याचेही अकोलकर म्हणाले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांची शालेय शिस्त, आरोग्य, आहार, संस्कार, विविध बाह्य परीक्षा, शालेय परीक्षा, पालकांची जबाबदारी, नवीन शैक्षणिक धोरण इत्यादी विषयांवर साईनाथ भोर, सुरेखा ढमाले व प्रमोद जाधव यांनी पालकांना मार्गदर्शन केले. पालकांच्या वतीने शीतल वल्हवणकर, सुवर्णा भुजबळ, अमृता चौधरी, प्रियांका अमुप, माधुरी भोर, विद्या विकास मंडळ उदापूरचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शालेय व्यवस्थापन कमिटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अर्जुन अमुप यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. तसेच पुढील काळात पाल्यांच्या प्रगतीसाठी अपेक्षा व्यक्त केल्या.
अहवाल लेखन सारिका डांगे, नियोजन लतीफ मोमीन व रोहिणी घाटकर, विजय देशमुख, राजेश दुधवडे, प्रसन्न तांबे यांनी केले. सुनील शितोळे, रमेश काळे यांनी बैठक व्यवस्था केली. दशरथ भाईक यांनी प्रास्ताविक, विठ्ठल डुंबरे यांनी अनुमोदन, योगेश गाढवे यांनी सूत्रसंचालन, तर शिक्षक प्रतिनिधी भरत भाईक यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com