ओतूर येथे जनआक्रोश मोर्चा
ओतूर, ता. २७ ः मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकलीवर झालेला अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ ओतूर (ता. जुन्नर) येथे महिला भगिनींचा जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.
ओतूर येथील पांढरी मारुती खुल्या व्यासपीठावर मंगळवारी (ता. २५) सायंकाळी या घटनेचा निषेध करून मेणबत्त्या पेटवून चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महिलांनी आपले मनोगत मांडताना तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी प्रांजल भाटे, सरपंच छाया तांबे, शिवानी पन्हाळे, अलका मुळे, अक्षदा पानसरे, मयूरी रसाळे, मनीषा खंडागळे, संचिता खंडागळे, पुष्पा गायकवाड, रेश्मा गायकवाड, सुरेखा गाढवे, जय बजरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल डुंबरे, रामदास तांबे छबूराव तांबे, पांडुरंग ढोबळे, नयन डुंबरे, वैभव राऊत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या मोर्चाचे नियोजन मनसेच्या महिला आघाडीच्या नेत्या प्रांजल भाटे यांनी व ग्रामस्थांनी केले होते. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
01088
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

