शितळेश्वर विद्यालयात हवामान निरीक्षण केंद्र

शितळेश्वर विद्यालयात हवामान निरीक्षण केंद्र

Published on

ओतूर, ता. ५ ः सितेवाडी (ता. जुन्नर) येथील शितळेश्वर विद्यालयात ऑटोमॅटिक वेदर स्टेशन (हवामान निरीक्षण केंद्र) नुकतेच सुरू करण्यात आले.
या ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचे उद्‍घाटन उत्साहात पार पडले. चाईल्डफंड इंडिया क्लायमेट चेंज प्रकल्पाद्वारे हे वेदर स्टेशन येथे बसवण्यात आले असून याबरोबर शितळेश्वर विद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वेदर स्टेशनचे उद्‍घाटन पंचायत समिती जुन्नरचे गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चाईल्डफंड इंडियाचे प्रकल्प व्यवस्थापक अभिजित मदने यांनी वेदर स्टेशनचे फायदे, त्याची कार्यपद्धती तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासासाठी त्याचा कसा प्रभावी वापर करता येईल, याबाबत सविस्तर माहिती दिली.
लांडे म्हणाले, ‘‘तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना वेदर स्टेशनला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.’’
विद्यार्थ्यांचे विशेष गट तयार करून भेट देणाऱ्या लोकांना वेदर स्टेशनची माहिती कशी द्यावी, याबाबतही त्यांनी सूचना देत मार्गदर्शन केले. या वेदर स्टेशनद्‍वारे प्रामुख्याने हवामान व त्यामधील बदलांबाबत अचूक व वैज्ञानिक माहिती देण्यात येणार आहे. या यंत्राद्वारे तापमान, पर्जन्यमान, अतिवारा, वाऱ्याचा वेग अशा महत्त्वाच्या हवामान विषयक घटकांची नोंद व अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमास जुन्नर तालुका पर्यटनचे यश मस्करे, सितेवाडीच्या सरपंच दीपाली पाटेकर, मुख्याध्यापक संतोष हांडे तसेच रवींद्र भोर, मिथुन मोजाड आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चाईल्ड फंड इंडियाचे शहाजी कसबे, योगेश मस्करे, शेवंत वाघ, दीपाली जगताप, कविता घोलप, विश्वास गालफाडे, रवी शिंदे व संजय नवले यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन काशिनाथ मोजाड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com