चैतन्य विद्यालयाचे चित्रकला स्पर्धेत यश
ओतूर, ता. १२ : येथील चैतन्य विद्यालय ओतूरचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयाची विद्यार्थिनी शर्वरी राजेंद्र आरोटे ही राज्य गुणवत्ता यादीत ८१वी आली. या दोन्ही परीक्षेस विद्यालयातील १४७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अ श्रेणीत २८, ब श्रेणीत ५१ व क श्रेणीत ६८ विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे, अशी माहिती कलाविभाग प्रमुख संतोष सोनवणे यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक संतोष सोनवणे व बाळासाहेब साबळे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे ग्रामविकास मंडळ ओतूरचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, रोहीदास घुले, मुख्याध्यापिका राजश्री भालेकर, संजय हिरे, अनिल उकिर्डे, अजित डांगे यांनी अभिनंदन केले.
इंटरमिजिएट परीक्षेत अ श्रेणी प्राप्त विद्यार्थी
शर्वरी राजेंद्र आरोटे (राज्य गुणवत्ता यादीत ८१वी), आदित्य संतोष फापाळे, अंजली योगेश खेत्री, अथर्व विठ्ठल कुटे, गार्गी राजेंद्र आरोटे, नंदिनी दीपक पाचपुते, नियती मनोज पटेल, पलक रामदास डोंगरे, श्रुती बाळू नलावडे, वरद चंद्रशेखर नलावडे.
एलिमेंटरी परीक्षेत अ श्रेणी प्राप्त विद्यार्थी
आराध्य प्रभाकर दिघे, आराध्या मंगेश डुंबरे, आर्या जीवन गाढवे, तन्वी प्रशांत डुंबरे, तेजल कैलास देवकर, यश्मी योगेश हांडे, सुप्रभा बाळासाहेब साबळे, स्वराज तुकाराम गायकर, शुभदा सुहास बनकर, सोनाली जितेंद्र इसकांडे, सृष्टी महादेव तौर, समृद्धी उमेश डुंबरे, रसिका प्रमोद लांडगे, ज्ञानेश्वरी विजय मांडे, कार्तिक संजय गायकर, आर्या विक्रांत बनकर, भार्गव संतोष लोहके, दिव्या दत्तात्रेय हाडवळे.
01304
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

