ओतूरला सूर्यनमस्कार संकल्प उपक्रमास प्रतिसाद

ओतूरला सूर्यनमस्कार संकल्प उपक्रमास प्रतिसाद

Published on

ओतूर, ता. २७ : ओतूर (ता. जुन्नर) येथील डॉक्टर असोसिएशन आयोजित रथसप्तमीच्या पर्वावर ‘रथसप्तमी सूर्यनमस्कार संकल्प ८ ते १०८ सूर्यनमस्कार’ हा आरोग्य जनजागृती उपक्रम ओतूर क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडला. ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि शिस्तबद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार संकल्प प्रथमच घेण्यात आल्याने ग्रामस्थांकडून ओतूर डॉक्टर असोसिएशनचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
या उपक्रमात साडेचारशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये सुमारे २०० विद्यार्थी आणि २०० हून अधिक ग्रामस्थांचा सहभाग होता. विशेष म्हणजे या उपक्रमात ११४ विद्यार्थ्यांनी आणि १०९ ग्रामस्थांनी १०८ सूर्यनमस्कार पूर्ण केले, या उपक्रमाची ही उल्लेखनीय बाब ठरली. १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागींचा प्रमाणपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक व ओतूर डॉक्टर असोसिएशनच्या समन्वयाने विशेष सहकार्य मिळाले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गाडगे महाराज विद्यालय, वसतीगृह, चैतन्य विद्यालय, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, सीताबाई महाविद्यालय/वसतीगृह व अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय यांचा मोलाचा सहभाग होता.
या कार्यक्रमाचे उद्‍घाटन जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, ओतूर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमित काशीद, पोलिस निरीक्षक एल. जी. थाटे, डॉ. भरत घोलप, आबा काशीद, डॉ. रश्मी घोलप यांनी दीपप्रज्वलन आणि धन्वंतरी पूजनाने करण्यात आले. उपक्रम यशस्वी करण्यास डॉ. शशांक फापाळे, डॉ. ज्ञानदेव हुलवळे, डॉ. अवधूत वल्हवणकर, डॉ. विशाल तांबे, डॉ. वैभव गायकर, डॉ. शाम गायकर, डॉ. सचिन खेडकर, डॉ. पुष्पलता शिंदे, डॉ. शुभांगी काशीद, डॉ. आदिती वल्हवणकर, डॉ. शालिनी नायकोडी, रवी ढमाले, दिलीप घोलप, आदींनी सहकार्य केले. प्रात्यक्षिके वर्षा गांधी, डॉ. अमित काशीद यांनी केली तर सूत्रसंचालन डॉ. गणेश नायकोडी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com