ओतूर, माळशेज पट्ट्यात स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद

ओतूर, माळशेज पट्ट्यात स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद

Published on

ओतूर, ता. २८ : अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी समजताच, बुधवारी (ता.२८) सकाळी ओतूर परिसरातील उदापूर, डिंगोरे, पिंपळगाव जोगा आणि संपूर्ण माळशेज पट्ट्यातील गावांमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत शोक व्यक्त केला. गावागावांत ग्रामस्थांतर्फे स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला.
गावागावात सर्व पक्षिय कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी प्रत्येक गावाच्या मुख्य चौकात एकत्र जमले आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी असा स्पष्टवक्ता आणि कार्यतत्पर नेता होणे नाही, अशा भावना व्यक्त केल्या जात होत्या.
सर्वपक्षीय कार्यकर्त्ये आपल्या भावना व्यक्त करत दिवंगत पवार यांना श्रद्धांजली वाहत होते. गावोगावी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद करत सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळल्याचे चित्र दिसून येत होते.

01390

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com