ज्येष्ठ नागरिक संघाकडून 
ओतूर येथे मतदार जागृती

ज्येष्ठ नागरिक संघाकडून ओतूर येथे मतदार जागृती

Published on

ओतूर, ता. २ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील ज्येष्ठ नागरिक संघाकडून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघ, ओतूर हा नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवून जनतेशी बांधिलकी जपत आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजवावा म्हणून जनजागृती अभियान रविवारी (ता. १) राबविण्यात आले.
अभियानानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ, ओतूरच्या कार्यालयापासून प्रभात फेरीचे आयोजन केले होते. त्यास ज्येष्ठांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठेतून पुढे पानसरे आळी, पाटील आळी, नगरवेस, मुंजाबा चौक, जुने एस‌टी स्टॅंड, मातंग वस्ती, बाजार पेठेतून ज्येष्ठ नागरिक संघ, ओतूर येथे सांगता करण्यात आली.
प्रभात फेरीमध्ये ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘ज्येष्ठ नागरिक संघाचे जाहीर आवाहन, करा मतदान’ आदी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी प्रभात फेरीमध्ये संघाचे अध्यक्ष रा. ज्ञा. डुंबरे, उपाध्यक्ष दत्तात्रय डुंबरे, किसन फापाळे, कार्याध्यक्ष मा. ल. जाधव, सचिव बाबाजी डुंबरे, आत्माराम खराडे, कोषाध्यक्ष पांडुरंग अहिनवे, संचालक भि. स. माळवे, विलास सुतार, अशोक सहाणे, रामदास ढमाले, एकनाथ डुंबरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com