ओतूरला अपघातात एक ठार, दोन जखमी
ओतूर, ता. ३ : ओतूर (ता. जुन्नर) दोन मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. ३) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ओतूर- ब्राह्मणवाडा मार्गावर झाला असून, यात वसंत सुरेश मुठे (वय २८, रा. त्रिशुलवाडी, सातेवाडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) हा तरुण ठार झाला आहे. तर, अमोल लक्ष्मण गिते (रा. राहटी मळा, ओतूर व अक्षय पांडुरंग मांडवे, रा. चिल्हेवाडी, ता. जुन्नर) हे दोघे जखमी झाले आहेत.
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी माहिती दिली की, सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्यादरम्यान ओतूर- ब्राह्मणवाडा मार्गावर ओतूर येथए फापाळेशिवार परिसरात वसंत मुठे हा दुचाकीवरून ओतूर बाजूकडून ब्राह्मणवाडा बाजूला जात होता. त्याच वेळी अमोल गिते समोरून दुचाकी चालवत येत होता. त्याची जोरदार धडक झाली. या अपघात अमोल गिते व अक्षय मांडवे किरकोळ जखमी झाले, तर वसंत मुठे गंभीर जखमी होऊन ठार झाला. तसेच, दोन्ही दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. पुढील तपास ओतूर पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

