ओतूरमध्ये विद्यार्थ्यांना आंब्याच्या रोपांचे वाटप

ओतूरमध्ये विद्यार्थ्यांना आंब्याच्या रोपांचे वाटप
Published on

ओतूर, ता. १० ः ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळ, ओतूर संचलित चैतन्य विद्यालय ओतूर येथे बीडीटी सोशल इम्पॅक्ट फाउंडेशनचा पुणे यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त १५० केशर जातीच्या आंब्याच्या रोपांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या परिसरात पिंपळ, बकुळा, फायकस, पिस्टल पाम आदी प्रकारच्या वृक्षांची ५० रोपे लावण्यात आली.
हा कार्यक्रम ग्रामविकास मंडळ ओतूरचे उपाध्यक्ष प्रभाकर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली. यावेळी बीडीटी सोशल इम्पॅक्ट फाउंडेशन पुण्याचे संस्थापक अध्यक्ष अक्षय तांबे म्हणाले की, ‘‘या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, कृषी आणि उपजीविका यांच्या सक्षमीकरणाकरिता काम केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणात प्रती जाणीव जागृती व्हावी याकरिता अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात. महिला व आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी प्राधान्याने योगदान व उपक्रम आयोजित केले जातात. शेतीसाठी शेतकऱ्यांना विविध प्रयोगिक मार्गदर्शन व साहाय्य पुरविले जाते. विद्यार्थ्यांनी मिळालेली रोपे आपल्या शेताच्या बांधावर लावून त्याचे संगोपन करावे व पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावे.’’
विद्यालयाच्या परिसरात ग्राम विकास मंडळ ओतूरचे उपाध्यक्ष प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, सीताराम ज्ञानदेव तांबे, जालिंदर राजाराम तांबे, रोहिदास बाळासाहेब तांबे यांच्या हस्ते पिंपळ, बकूळा या वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी प्रदीप गाढवे, पंकज घोलप, रामदास तांबे, सोमनाथ टिकेकर, डॉ. विशाल तांबे, फार्मर फॉर फॉरेस्टचे संतोष जोरी, राजश्री भालेकर, संजय हिरे, अनिल उकिरडे, अजित डांगे, राजाराम शिंदे, विशाल चौधरी, लक्ष्मण दुडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद खेत्री यांनी, तर भाऊसाहेब खाडे यांनी आभार मानले.

01492

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com