ओतूरमध्ये विलासराव तांबे यांना अभिवादन
ओतूर, ता. १३ : ओतूर (ता. जुन्नर) येथील गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी विलासराव तांबे यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे म्हणाले, ‘‘विलासराव तांबे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसार आणि समाज उन्नतीसाठी समर्पित केले. ग्रामीण भागातील, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आणि त्यातल्या त्यात महिलांसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण हे ब्रीदवाक्य संस्थेचे धारण करून सर्वांना शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने उभ्या केलेल्या शैक्षणिक संकुलामुळे हजारो विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमय होत आहे. तांबे यांचे शिक्षणावरील विचार, शिस्तप्रियता आणि दूरदृष्टी आजही मार्गदर्शक ठरत आहे.’’
‘‘ग्रामीण आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उभारलेले विलासराव तांबे यांचे शैक्षणिक कार्य एक जिवंत चळवळ ठरली आहे.’’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गणेश दामा यांनी अभिवादनावेळी केले. याप्रसंगी सचिव वैभव तांबे, संचालिका नीलम तांबे, खजिनदार मयूर ढमाले, प्राचार्य डॉ. गोविंद खरात, डॉ. रमेश काकडे, डॉ. संजय देवकर, मुख्याध्यापक माणिक बोऱ्हाडे, संतोष झावरे, बसीर शेख, डॉ. स्मिथ ॲलेक्स उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

