उदापूरला शिवजयंतीनिमित्त प्रवेशद्वाराचे लोकार्पण
ओतूर, ता. २३ : उदापूर (ता. जुन्नर) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा शिवजयंतीला सायंकाळी उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमात साजरा झाला.
सह्याद्री गणेश मित्र मंडळाच्या पुढाकाराने आणि लोकसहभागातून अंदाजे २८ लाख रुपये खर्च करून या ग्रामवेशीचे चार वर्षांत निर्माण केले आहे. या वेशीच्या निर्माणासाठी उदापूरकर, तसेच मुंबईकर- पुणेकर ग्रामस्थांनी उदार हस्ते देणग्या दिल्या. शिवजयंतीच्या मुहूर्तावर त्याचे लोकार्पण आमदार शरद सोनवणे, माजी आमदार ॲड. दिलीप ढमढेरे, बाळासाहेब दांगट, ॲड. संजय काळे यांचे हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
याप्रसंगी शिवछत्रपती मंडळ कुलवडे मळा, युवा प्रतिष्ठान उदापूर, सह्याद्री गणेश मंडळ व यशोदीप गणेश मंडळ उदापूर यांनी संयुक्तपणे शिवनेरीहून मशाल प्रज्वलित करून आणली. त्यानंतर शिवपालखीची दिमाखदार मिरवणूक गावातून काढण्यात आली. या मिरवणुकीत अश्वनृत्य, तलवारबाजी दांडपट्टा, लाठी- काठी आदी मर्दानी खेळ सादर करण्यात आले. यामध्ये गावातील महिला बचत गटातील महिला व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या ५० महिलांच्या पारंपरिक वेशभूषेतील ढोल पथकाने व पुरुषांच्या लेझीम पथकाने शिवरायांना दिलेली मानवंदना सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. त्यानंतर सह्याद्री चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अत्यंत रोमहर्षक आतशबाजीने नामफलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. या प्रसंगी या ग्रामवेशीच्या निर्मितीसाठी योगदान देणारे इंजिनिअर योगेश हांडे व मूर्तिकार संतोष ढवळे, तसेच कार्यक्रमाचे अन्नदाते भागूजी कुलवडे, केशव शिंदे, डॉ. सी. के. पवार, दतात्रेय कुलवडे यांचा सन्मान केला. तसेच, शिवरायांची महाआरती झाली.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बबन तांबे, मोहित ढमाले, तुषार थोरात, माजी सभापती ज्योती शिंदे, पंचायत समिती सदस्या मनीषा डावखर, निलम आमले, उदापूरचे सरपंच सचिन आंबडेकर, ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष संजीव शिंदे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तुळशीराम शिंदे, सचिव किशोर होनराव, माजी सरपंच प्रमिला शिदे, माजी उपसरपंच डॉ. पुष्पलता शिंदे, सावता माळी मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष विष्णू शिंदे, पुणेकर मंडळाचे अध्यक्ष शशिकांत आरोटे आदी उपस्थित होते. संजय ढमढेरे यांनी प्रास्ताविक, मोहन वल्हवणकर यांनी स्वागत; तर साईनाथ भोर यांनी सूत्रसंचालन केले. मंडळाचे अध्यक्ष दिनेश भास्कर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

