डुंबरवाडीत दोन शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार

डुंबरवाडीत दोन शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार
Published on

ओतूर, ता.१० : डुंबरवाडी (ता.जुन्नर) येथील ओतूर-डुंबरवाडी शिवेवर मंगळवारी (ता.१०) पहाटे चार वाजता बिबट्याने मेढ्यांच्या कळपावर हल्ला करून दोन शेळ्या ठार केल्या आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाबाजी टकले यांच्या मेंढ्याच्या कळप सोमवारी रात्री अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील सुरेश शिवराम डुंबरे यांच्या शेतात मुक्कामी होता. या मेढ्यांच्या कळपावर बिबट्याने जाळीत घुसून दोन शेळ्या ठार केल्या.
घटनेची माहिती डुंबरवाडीचे पोलिस पाटील किरण भोर यांनी ओतूर वनविभागाला माहिती दिली. ओतूरचे वनक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विश्वनाथ बेले व वनकर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संबंधित व्यक्तीला आर्थिक नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे .
दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने सरपंच शीतल गोरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com