

ओतूर, ता. १८ : उदापूर (ता. जुन्नर) येथील गणपती फाटा परिसरात बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर केलेल्या हल्ल्यात एक मेंढी ठार झाली.
गंगाराम बरकडे यांच्या मेंढ्यांचा कळप उदापूर येथील विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या शेतात मुक्कामी होता. बुधवारी पहाटे बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर पहाटे हल्ला करून कळपातील एक मेंढी ठार केली. याबाबत ओतूर वनविभागाला शिंदे यांनी माहिती दिली.
ओतूर वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक के. एस. खरोडे व वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संबंधित मेंढपाळाला शासकीय नियमानुसार आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान, उदापूर गावाच्या हद्दीत नांदई वस्ती, गणेश नगर, गणपती फाटा परिसरात वनविभागाने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लाववा, अशी मागणी उदापूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजीव शिंदे, सरपंच सचिन आंबडेकर, प्रभाकर शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाजीराव कुलवडे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.