

ओतूर, ता. १८ : ओतूर (ता. जुन्नर) येथे ‘यशोगाथा उत्तमापूरची अर्थात ओळख ओतूरची’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. १८) सायंकाळी तालुक्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाला.
ओतूर ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष माधवराव डुंबरे यांनी वयाच्या ९०व्या वर्षी हे पुस्तक लिहिले आहे. माधवराव डुंबरे लिखित ओतूरचा पाऊणशे वर्षांचा इतिहास ‘यशोगाथा उत्तमापूरची अर्थात ओळख ओतूरची’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा माजी आमदार दिलीप ढमढेरे, अतुल बेनके, नवी मुंबईचे सभापती प्रकाश मोरे, सीमा सोनवणे, लेखक सुधाकर घोडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपत फुलवडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रश्मी घोलप यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल शितोळे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक डुंबरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.