ओझरच्या विघ्नहर विद्यालयात 
शैक्षणिक साहित्याचे वाटप

ओझरच्या विघ्नहर विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप

Published on

ओझर, ता. ११ ः ओझर (ता. जुन्नर) येथील विघ्नहर विद्यालयामध्ये अंगणवाडी, प्राथमिक, तसेच माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक सुधीर दांगट यांनी दिली.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य शिरीष बोऱ्हाडे मित्र परिवाराने माजी आमदार वल्लभ बेनके, विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा उपक्रम राबविला.

शालेय साहित्यात वह्या, कंपास बॉक्स, पॅड, जेवणाच्या डब्यांचा समावेश होता. यावेळी ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे, सूरज वाजगे, जगन्नाथ कवडे, अक्षदा मांडे, श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मिलिंद कवडे, सूर्यकांत रवळे, गणपत कवडे, रंगनाथ रवळे, सरपंच तारामती कर्डक, उपसरपंच जयश्री कवडे, महेश कवडे, संतोष मांडे, सुरेश टेंभेकर, मीराताई जगदाळे, सर्व शिक्षक, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मार्च २०२३ मधील एसएससी बोर्ड परीक्षेत यश संपादन केलेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार बेनके यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना आमदार बेनके म्हणाले की, हल्लीच्या काळात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून उच्च शिक्षण घ्यावे, तसेच कला-क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी, तर पर्यवेक्षक विलास चासकर यांनी उपस्थितांचे आभार मानले
-------------------.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.