शिरोली बुद्रुक येथे मतदानाला ज्येष्ठ महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोली बुद्रुक येथे मतदानाला ज्येष्ठ महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ओझर, ता. १३ : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडले. तीन मतदान केंद्रावरून नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, दुपारपर्यंत साधारणपणे तीस टक्के मतदानाची नोंद झाली. गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्गाने मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तसेच अपंग मतदारांसाठी दहा मे रोजी गृह मतदान घेण्यात आले होते. परंतु अनेक मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचे सांगून गृहमतदान नाकारले होते. आज त्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावत लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान केले. शिरोली बुद्रुक येथील ८८ वर्षीय राधाबाई भाऊसाहेब शेरकर यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले व लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करा असे आवाहनही केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com