गोळेगावात गुणकारी काळ्या हळदीमुळे झळाळलं उत्पन्नाचं ‘सोनं’
ओझर, ता. ३ : गोळेगाव (ता. जुन्नर) येथील पोलिस सेवेत कार्यरत असणाऱ्या मनीषा ताम्हाणे यांनी काळ्या हळद लागवडीचा केवळ १० गुंठ्यात पहिलाच प्रयोग यशस्वी केला आहे. आरोग्यासाठी बहुगुणी असणारी हळद पावडर व बियाणांपासून त्यांनी मागील सहा महिन्यात सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. बियाणे तसेच पावडरला परराज्यातूनही ऑनलाइन मागणीही वाढत आहे. यामुळे हळदीच्या शेतीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
मनीषा ताम्हाणे यांनी एका नातलगांकडून काळ्या हळदीचे कंद आणले होते. एक वेगळा प्रयोग म्हणून त्याची लागवड केली. हळदीचे कंद द्राक्ष बागेच्या कडेला सुपीक जमिनीत रोपण केले. ते अंकुरल्यावर त्याच्या कोंबातून हळदी सारखी दिसणारी हिरवी पाने दिसू लागली. परंतु त्या पानांमध्ये भागातील शिरा काळसर रंगाच्या होत्या. योग्य प्रमाणात पाणी आणि पोषक मूलद्रव्य मिळाल्याने हळदीच्या झाडांची वाढ चांगली झाली. सहा महिन्यांनंतर हळदीच्या झाडाच्या खाली उकरून पाहिले असता जमिनीत हळदीच्या झाडाखाली नव्याने हळदीचे कंद लागले होते व ते आतून पूर्णपणे काळसर होते. त्यांनी त्याची काढणी करून सदर काळ्या हळदीच्या वाणाची त्यांनी वाढ करण्याचे ठरवले व त्यांनी शेताच्या एका कडेला जमिनीची मशागत करून त्या कंदाची पुन्हा लागवड केली व अधिक उत्पादन मिळविले. दरम्यान, उत्पादन वाढविण्यासाठी द्राक्ष उत्पादक असलेले पती मुकुंद वसंत ताम्हाणे मनीष यांना मार्गदर्शन घेतले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून काळ्या हळदीचा प्रचार व प्रसार करीत आहे. यामुळे बियाणे व पावडरला स्थानिक तसेच परराज्यातूनही मागणी वाढत आहे. हळदीची पावडर तयार करून त्याची ऑनलाइन विक्री केल्याने नफ्यात दिवसेंदिवस वाढ आहेत आहे.
- मनीषा ताम्हाणे, हळद उत्पादक
अशी केली विक्री
५०० ते ६०० रुपये .......ओली हळद (प्रतिकिलो)
३०० रुपये ............हळदीचे बियाणे (प्रतिकिलो)
या आराजांवर उपयुक्त
कर्करोग
रक्तदाब
मधुमेह
प्रयोगशाळेतून गुणवत्तेची तपासणी
ताम्हणे कुटुंबाला द्राक्ष शेतीचा अनुभव असल्याने त्यांनी काळ्या हळदीचे कंद तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. देशभरात इतर ठिकाणी उत्पादीत होणाऱ्या काळ्या हळदीच्या तुलनेत त्यांच्याकडे उत्पादीत झालेल्या हळदीत अधिक औषधी गुणधर्म असल्याचा अहवाल त्यांना तपासणीतून प्राप्त झाला. मग त्यांनी त्याचे उत्पादन वाढविण्यास सुरुवात केली.
.
01599, 01597
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.