हिवरेत तीन बिबट्यांकडून कालवडीचा फडशा

हिवरेत तीन बिबट्यांकडून कालवडीचा फडशा

Published on

ओझर, ता.२७ : हिवरे खुर्द (ता.जुन्नर) येथील जनावरांच्या गोठ्यामध्ये शिरून एकाच वेळी तीन बिबट्यांनी कालवडीवर हल्ला केला. कालवडीला ओढत आणून गोठ्याबाहेरच एकत्र बसून फडशा पाडला. यामुळे शेतकरी रभाजी भोर यांचे मोठे नुकसान झाले.
भोर यांच्या घराशेजारी राहणारे गोरक्षनाथ माने यांनी गायी ओरडल्याचा आवाज ऐकल्यावर खिडकीतून डोकावून पाहिले असता बिबटे कालवडीला खात बसले होते. त्यांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ घटनास्थळी आले. यानंतर बिबट्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, हिवरे परिसरात दिवसाही बिबट्यांचा मोकाट वावर असतो. यामुळे नागरिकांचे घराबाहेर फिरणे अवघड होऊन बसले आहे.
जुन्नर तालुक्यातील ओझर, तेजवाडी, शिरोली बुद्रुक, शिरोली खुर्द, हिवरे खुर्द या गावांमध्ये वारंवार बिबट्याचे हल्ले होतात. या ठिकाणी पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे. वनविभागाने या ठिकाणी तत्काळ पिंजरे लावावेत, अशी मागणी हिवरे खुर्दचे सरपंच लक्ष्मण वायकर तसेच ग्रामस्थांनी केली.
दरम्यान, कालवडीचा पंचनामा करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी सोनवणे व शिंदे तत्काळ हजर झाले व त्यांनी कालवडीचा पंचनामा केला असल्याची वनपरिक्षेत्र अधिकारी भुजबळ यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बिबट्या शेतामध्ये किंवा उसाच्या सरीत लपून राहत नाही, तो कोरड्या जागेकडे आश्रय घेतो. अशावेळी तो घराशेजारील मोकळी जागा, कांदाचाळ, शेतातील छपरे किंवा गोठे येथे आश्रय घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये गवत चारा काढण्यासाठी जात असताना काळजी घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com