पारंपरिकता जपत तरुणाईची 
मांदारने-जेजुरी बैलगाडी वारी

पारंपरिकता जपत तरुणाईची मांदारने-जेजुरी बैलगाडी वारी

Published on

ओझर, ता. १८ : जुन्नर तालुक्यातील मांदारने गावातील तरुणांनी पारंपरिकतेचे जतन करत जेजुरीकडे बैलगाडीने प्रस्थान केले. या वारीमध्ये मांदारने गावातील दहा बैलगाड्यांसह एका ट्रॅक्टर ट्रॉलीचा सामावेश असल्याचे बाळासाहेब महाकाळ यांनी सांगितले. मांदारने ते जेजुरी हा प्रवास पाच दिवसांचा असून परतीच्या प्रवासासह त्यांना नऊ दिवस लागतील. प्रवासादरम्यान आवश्यक असलेली शिदोरी, स्वयंपाकाचे साहित्य, जनावरांसाठीचा चारा, पाणी तसेच मुक्कामासाठीचे साहित्य त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये घेतले आहे. वास्तविक पाहता आजकालच्या जलद युगात हा प्रवास वाहनाने एका दिवसात पूर्ण होतो. या शेतकऱ्यांकडेही लांबच्या प्रवासासाठी स्वतःची अत्याधुनिक वाहने आहेत. परंतु वाडवडिलांनी घालून दिलेल्या परंपरेचे जतन करत मांदारने गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून महाशिवरात्रीच्या निमित्ताने बैलगाडीने जेजुरीकडे प्रस्थान करतात. यंदाच्या वर्षी गावात दुःखद घटना घडल्याने गावकऱ्यांची वारी लांबणीवर गेली. त्यामध्ये खंड पडू नये म्हणून गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन शिवजयंती उत्सवाच्या एक दिवस अगोदर बैलगाडा वारीचे नियोजन करत परंपरा कायम राखली आहे. त्यामध्ये गुरू महाकाळ, शुभम महाकाळ, राजेंद्र सोनवणे गोरक्षनाथ महाकाळ, संतोष महाकाळ, प्रकाश महाकाळ, संभाजी चौधरी, विजय आरोटे, प्रमोद आरोटे, मच्छिंद्र गाढवे, प्रतीक बुगदे, नितीन महाकाळ, निखिल दाभाडे तसेच कुटुंबातील महिलांचाही सामावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com