महिलेस बिबट्याने ओढून नेल्याची ठरली अफवा

महिलेस बिबट्याने ओढून नेल्याची ठरली अफवा

Published on

पाबळ, ता.१० : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील तावरे वस्ती येथील महिलेला बिबट्याने ओढून नेल्याची अफवा पसरली होती. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन शोध घेतला असताना महिला शेतातच मिळून आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन शिरूर वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कवठे येमाई (ता. शिरुर) येथील तावरे वस्ती येथील महिला बुधवारी (ता.१०) सकाळच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली होती. सदर महिलेला बिबट्याने ओढून नेल्याची अफवा परिसरामध्ये पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांना मिळताच वनपाल गणेश पवार, वनरक्षक नारायण राठोड, रेस्क्यू टीमचे कर्मचारी हनुमंत कारकुड, रोहित येवले, श्रेयस उचाळे, अविनाश सोनवणे, सुदर्शन खराडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून बिबट्याच्या पायांचे ठसे तपासले. मात्र, कोठेही बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले नाही. तब्बल चार तास राबवलेल्या शोध मोहिमेनंतर महिला शेताच्या शेजारी नदीच्या कडेला बसलेली मिळून आली.
यावेळी अधिक चौकशी केली असता, संबंधित महिला घरात झालेल्या किरकोळ वादातून शेतात जाऊन बसल्याचे समोर आले. यावेळी वनपाल गणेश पवार व वनरक्षक नारायण राठोड यांनी नागरिकांना बिबट्या बाबत मार्गदर्शन केले. नागरिकांनी कोठेही बिबट्या बाबत अफवा पसरवू नये तसेच अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी केले.

00749

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.