आर्यन पुंडेची भालाफेक स्पर्धेत विभाग स्तरावर निवड

आर्यन पुंडेची भालाफेक 
स्पर्धेत विभाग स्तरावर निवड
Published on: 

पाबळ, ता.१७ : कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आर्यन पुंडे याची भालाफेक स्पर्धेसाठी पुणे विभाग स्तरावर निवड झाल्याची माहिती प्राचार्य विनोद शिंदे यांनी दिली.
आर्यन याने राजे शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात १७ वर्षे वयोगटात सहभाग घेतला होता. त्याने ५२ मीटर भालाफेक करून पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला असल्याने त्याची पुणे विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली.
प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द व मेहनतीच्या जोरावर आर्यनने हे यश मिळविले. त्याला प्रकाश चव्हाण व चंद्रकांत धुमाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आर्यनच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा अंजली घोलप, सचिव सदाशिव पुंडे, पर्यवेक्षक मनोज धुमाळ, सरपंच राजश्री रूपनेर, उपसरपंच योगेश पुंडे, शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे आदींनी आर्यनचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.