शेळीवर हल्ला करताना बिबट्या पडला विहिरीत

शेळीवर हल्ला करताना बिबट्या पडला विहिरीत
Published on

कवठे येमाई, ता.१८ : सविंदणे (ता.शिरूर) येथे पहाटेच्या सुमारास थरारक घटना घडली. नाथनगर परिसरात एका गोठ्यातील शेळीवर हल्ला करून शेळीला घेऊन जात असताना बिबट्याचा अंदाज चुकला आणि तो थेट शेळीसह विहिरीत कोसळला. ही घटना मंगळवारी (ता.१८) पहाटेच्या सुमारास शेतकरी प्रभू सावळेराम नरवडे यांच्या शेतातील गोठ्याजवळ घडली. शेळ्यांच्या ओरडण्याचा व बिबट्याच्या आवाजाने शेजारी झोपलेल्या व्यक्तीला जाग आली आणि त्यांनी जवळील विहिरीत डोकावून पाहिले. यावेळी बिबट्या शेळीला घेऊन विहिरीत पडलेला दिसला. यामध्ये शेळी ठार झाली. याबाबत माहिती समजताच शिरूर वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी भानुदास शिंदे, नियत क्षेत्र अधिकारी नारायण राठोड, वन कर्मचारी हनुमंत कारकुड हे तत्काळ रेस्क्यू पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत पिंजऱ्याच्या सहाय्याने बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले.
01083

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com