कत्तलीसाठीच्या  
१६ वासरांची सुटका

कत्तलीसाठीच्या १६ वासरांची सुटका

Published on

पाबळ, ता. १४ : पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी रस्त्यावरून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असलेल्या १६ वासरांची सुटका करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले. या प्रकरणी पोलिसांनी शाबुद्दिन आयनुद्दिन मदारी (रा. हळदी मोहल्ला, शिरूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
होळीच्या दिवशी एका पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणावर जनावरे अवैधरीत्या कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय चौधर, पोलिस शिपाई विशाल देशमुख आणि अमोल रासकर यांनी पाबळ येथील पिंपळवाडी रस्त्यावर सापळा रचून वाहनांची तपासणी केली. त्यावेळी पिकअप वाहनात (क्र. एमएच १२ पीयू ४८२२) अत्यंत दाटीवाटीने भरून नेली जात असलेली १६ वासरे आढळून आली. याबाबत पोलिसांनी पिकअप चालकाकडे चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक तपासणीअंती वासरांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी संबंधित वासरे ताब्यात घेत गोशाळेत दाखल केली असून, पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com