टेम्पोच्या धडकेत 
दुचाकीस्वार वाचले

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार वाचले

Published on

कवठे येमाई, ता. १३ : मलठण (ता. शिरूर) येथील दंडवतेवस्तीजवळ भरधाव टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दुचाकीचे मोठे नुकसान झाले. संबंधित टेम्पो चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला.
याबाबत प्रणव चंद्रकांत गाढवे (वय २१, रा. सविंदणे, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तो त्याच्या दुचाकीवरून (क्र. एम.एच. १२ व्ही.यू. २४७९) मित्र प्रशांत विजय पवार याला सोबत घेऊन रांजणगाव येथे कामासाठी जात होता. दरम्यान मलठण गावातील दंडवते वस्तीजवळ समोरून भरधाव आलेल्या टेम्पोने (क्र. एम.एच. १२ डब्ल्यू.जे. ६१६८) अचानक आडवे येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दोघांनाही शारीरिक दुखापत झाली नसली, तरी दुचाकीचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावर न थांबता पळून गेला. पाठीमागून पाठलाग करत टेम्पोचा माग काढला असता तो क्रशर पॉइंट येथे उभा सापडला. परंतु, चालकाने तिथेही टिपर सोडून पळ काढला. पुढील चौकशीत टिपरचे मालक राहुल खरपुडे यांनी संबंधित वाहनावर दादाभाऊ डांगे (रा. सोनेसांगवी, ता. शिरूर) हा चालक म्हणून काम करत असल्याची माहिती दिली. शिरूर पोलिसांनी टेम्पो चालक डांगे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हवालदार गरकळ करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com