पाबळ-कान्हूर-मेसाईसाठी टँकर सुरू करण्यासाठी परवानगी

पाबळ-कान्हूर-मेसाईसाठी 
टँकर सुरू करण्यासाठी परवानगी
Published on

पाबळ, ता. १८ : उन्हाळ्याच्या झळा वाढत असतानाच पाबळ आणि कान्हूर मेसाई (ता. शिरूर) परिसराला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर प्रशासनाकडून टँकरद्वारे तातडीचा उपाय करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, उपविभागीय अधिकारी पूनम अहिरे यांनी दोन्ही गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
पाबळ च्या वार्ड क्र ३ व वार्ड क्र ६ साठी दररोज १२ हजार लिटर क्षमतेच्या आठ टँकर खेपा तर कान्हूर मेसाई साठी सहा टँकर खेपा करण्यात येणार आहेत. तातडीने हे टँकर सुरू करण्यात येतील, अशी माहिती पाबळचे सरपंच सोपान जाधव आणि कान्हूर मेसाई च्या सरपंच आसिया तांबोळी यांनी दिली.
यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने थिटेवाडी बंधारा व गावच्या आजूबाजूचे पाझर तलाव लवकर कोरडे पडले. परिणामी विहिरींनीही लवकरच तळ गाठला. यामुळे पाबळ व कान्हूर मेसाई परिसरातील नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांना ही खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
गावकऱ्यांच्या या समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतींनी शिरूर चे तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. अखेर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत टँकर सुरू करण्यास मंजुरी दिली असून, यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आकडेवारी (प्रस्तावाप्रमाणे)

गाव/वस्ती बाधित लोकसंख्या मंजूर टँकर खेपा

पाबळ वार्ड क्र ३ २४९६ ४

पाबळ वार्ड क्र ६ ३६२० ४

कान्हूर मेसाई ४०२८ ६

फोटो : संग्रहित टँकर फोटो वापरण्यास विनंती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com