कवठे येमाई येथे ट्रक उलटला

कवठे येमाई येथे ट्रक उलटला

Published on

कवठे येमाई, ता. ५ : अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई (ता. शिरूर) गावच्या हद्दीतील बंटी ढाब्याजवळ अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. पंधरा दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालेल्या ठिकाणीच गुरुवारी (ता.४) पहाटेच्या सुमारास सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून, प्रवाशांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणारा ट्रक (क्र.एमएच ४८ एजी ७१०५) कवठे येमाई बाजूकडून पारगाव कारखान्याकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत उलटला. यामध्ये ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला असून, चालक जखमी झाला आहे. त्याचे नाव व पत्ता अद्याप समजू शकलेले नाही.
दरम्यान, अष्टविनायक महामार्गावरील दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांमुळे स्थानिकांचा प्रवास धोकादायक झाला असून, काही जणांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. कवठे येमाई, इचकेवाडी, पोंदेवाडी फाटा येथील बसथांबे, संरक्षक कठडे यांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली आहे. ठिकठिकाणच्या गटार वाहिनीची दुरवस्था व अपूर्ण कामांमुळे रस्त्यांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.आवश्यक ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे.

01383

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com