टाकळी हाजी परिसरातील अवैध धंद्यावर कारवाई
कवठे येमाई, ता. ९ : टाकळी हाजी (ता. शिरूर) पोलिस दूरक्षेत्रातील वाढत्या चोऱ्या, अवैध दारूधंदे आणि बेकायदा गुटखा विक्रीच्या घटनांवर ‘सकाळ’ ने वृत्ताच्या माध्यमातून प्रकाश टाकताच पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. बुधवारी (ता. ८) शिरूर पोलिसांच्या विशेष पथकाने धडक कारवाई करत चार ठिकाणी गावठी हातभट्टी आणि दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत सव्वा लाख रुपये किमतीची गावठी दारू जप्त करून नष्ट केली.
शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नितीन सुद्रिक, अक्षय कळमकर आणि बी. के. भवर यांच्या पथकाने कवठे येमाई, पिंपरखेड, जांबुत आणि आमदाबाद (ता. शिरूर) या गावातील अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या ठिकाणी धाडी टाकत ही कारवाई केली.
याप्रकरणी शिरूर तालुक्यातील सागर गणपत गडगुळ, संदीप निवृत्ती मुंजाळ (रा. कवठे येमाई), भाऊसाहेब सावळेराम भोर (रा. पिंपरखेड), प्रवीण कैलास सोनवणे (रा. जांबुत) यांच्यासह अंबादास सीताराम तिळघाम (रा. अकोला, जि. नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक नागरिकांच्या तक्रारी व ‘सकाळ’ मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे टाकळी हाजी परिसरातील अवैध दारू व्यवसायाला तात्पुरता ‘ब्रेक’ लागला आहे. मात्र, या धंद्यांचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी पोलिसांनी या पुढेही सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गावठी हातभट्टी निर्मिती व विक्री, तसेच विना परवाना देशी- विदेशी दारूचा साठा व विक्री यासारख्या अवैध कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांना शिरूर पोलिस प्रशासनाचे सुस्पष्ट आव्हान आहे की, त्यांनी त्वरित हे बेकायदेशीर उद्योग बंद करून कायद्याचा आदर करावा. अन्यथा, पोलिस प्रशासनाकडून कठोर पावले उचलत कठोर कारवाई केली जाईल.
-संदेश केंजळे, पोलिस निरीक्षक, शिरूर
01488, 01489
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.