

पाबळ, ता. २ : खैरेनगर (ता. शिरूर) येथील दत्तात्रेय तात्याबा खैरे यांची भारतीय सैन्यात ‘सुभेदार मेजर’ या पदावर पदोन्नती झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीच्या जोरावर त्यांनी मिळवलेल्या या यशामुळे शिरूर तालुक्यासह संपूर्ण पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे. खैरे सन १९९८मध्ये वयाच्या १७व्या वर्षी शिपाई म्हणून सैन्यात भरती झाले होते. २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी कारगिल, सियाचिन आणि ग्लेशियर यांसारख्या दुर्गम युद्धक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी ‘बेस्ट कॅडेट’ पदकाने सन्मानित केले आहे. तसेच दिल्लीतील कर्तव्य पथावरील संचलनात त्यांनी दोनदा सहभाग नोंदवला आहे. सध्या ते लडाख येथे १०२ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत.
01845
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.