पाबळ-कान्हूर मेसाईत पाणीबाणी

पाबळ-कान्हूर मेसाईत पाणीबाणी
Published on

पाबळ, ता. ११ : शिरूर तालुक्यातील पाबळ व कान्हूर मेसाई परिसरात विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत असून, प्रशासनाकडे तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाबळ परिसरातील १२ गावांसह वाड्या-वस्त्यांमध्ये थिटेवाडी बंधारा कोरडा पडल्याने संकट ओढवले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाबळ व कान्हूर मेसाई ग्रामपंचायतींनी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे टँकरसह चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी यापूर्वी गावकऱ्यांनी अनेक आंदोलने केली असून, ग्रामपातळीपासून मंत्रालयापर्यंत बैठका पार पडल्या आहेत. आश्वासने देत विविध योजना आखण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीचा अभाव जाणवत आहे.
कान्हूर मेसाई येथे ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत कोट्यवधी रुपयांची योजना राबविण्यात आली. मात्र , निधीअभावी या योजनेला खीळ बसली असून, नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तीव्र उन्हामुळे सध्या परिस्थिती अत्यंत बिकट बनली असून, पाण्याअभावी पीके व जनावरांचा चारा जळून चालला आहे. प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास पाणीटंचाई अधिकच तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गावाचे नाव: पाबळ
वॉर्डा क्र १ चौधरी वस्ती
लोकसंख्या - २४४१

वॉर्डा क्र ३ - फुटाणवाडी
लोकसंख्या - २४९६

वॉर्डा क्र ६ - पिंपळवाडी - थापेवाडी
लोकसंख्या - ३६२०
----------------------------
पशुधन संख्या - ६५०३


गावाचे नाव - कान्हूर मेसाई
लोकसंख्या - ४०२८
पशुधन संख्या - २१८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com