मोटारीची काच फोडून पैशांच्या बॅगची चोरी

मोटारीची काच फोडून
पैशांच्या बॅगची चोरी
Published on

पाबळ, ता. ११ : पाबळ (ता. शिरूर) येथे हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या व्यावसायिकाच्या मोटारीची भरदुपारी काच फोडून चोरट्यांनी पैशांची बॅग लंपास केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाबळ येथील हॉटेल शिवराज येथे वैभव विकास आडवळे (वय २४, रा. जवळके बुद्रुक, ता. खेड) हे त्यांच्या मित्रांसह जेवणासाठी आले होते. त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी आणलेले सुमारे एक लाख रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग मोटारीमध्ये ठेवली आणि मोटार पार्किंगमध्ये उभी केली होती. दरम्यान, जेवण आटोपून बाहेर आल्यानंतर त्यांना मोटारीची काच फुटलेली दिसली. त्यांनी तपासणी केली असता पैशांची व कागदपत्रांची बॅग गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुचाकीवरून आलेल्या दोन तरूणांनी अत्यंत शिताफीने मोटारीची काच फोडून बॅग लांबवल्याचे उघड झाले. याप्रकरणी वैभव आडवळे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com