आमदाबाद येथे एकाच रात्री फोडली दोन विद्युत रोहित्र

आमदाबाद येथे एकाच रात्री 
फोडली दोन विद्युत रोहित्र
Published on

शिरूर, ता. २३ : आमदाबाद (ता. शिरूर) येथे चोरट्यांनी एकाच रात्री दोन विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याची घटना मंगळवारी (ता. २१) रात्री घडली. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून, तत्काळ विद्युत रोहित्र उपलब्ध न झाल्यास पिके करपून जाण्याची शक्यता आहे‌.
माशेरेमळा परिसरातील स्थानिक शेतकरी चक्रधर जाधव हे सकाळी शेतात गेले असता, त्यांना विद्युत रोहित्र फोडलेले आढळून आले. त्यांनी याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. महावितरणच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता चोरट्यांनी रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा लंपास केल्याचे उघड झाले. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून, पिकांना पाणी देण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. याप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ उत्तम वाल्मिक गाडेकर (रा. रामलिंग रोड, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

01880

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com