आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत खेडमधील गडद प्राथमिक शाळा द्वितीय

आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत खेडमधील गडद प्राथमिक शाळा द्वितीय
Published on

पाईट, ता. ३ : पुणे जिल्हा प्रशिक्षण संस्था, पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत खेड तालुक्यातील गडद प्राथमिक शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा पुण्याच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह आणि बीटी शहाणे विद्यालयात पार पडल्या.
गडद शाळेने सादर केलेल्या नारायण करपे लिखित व दिग्दर्शित ‘साथ मैत्रीची’ या बालनाट्याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक तर लेखक कर्पे यांना उत्कृष्ट दिग्दर्शन, लेखनाचा प्रथम क्रमांक मिळाला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुण्याच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे गौरवण्यात आले. जिल्हास्तरावर उत्कृष्ट अभिनयासाठी ऋतुजा संतोष शिंदे, जान्हवी सुभाष शिंदे, श्रावणी वसंत शिंदे, मयूरी सखाराम शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. बक्षीस वितरणासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रमेश चव्हाण, अभिनेत्री प्रतिमा जोशी, नेहा बेलसरे, वरिष्ठ अधिव्याख्याता बाळकृष्ण वाटेकर, नाट्य सेन्सॉर बोर्ड सदस्य गिरीश भुतकर, कार्याध्यक्ष शंकर घोरपडे, प्रकाश खोत, संजीव मांढरे आदी उपस्थित होते. या नाटकाचे नेपथ्य तानाजी महाळुंगकर, रंगभूषा संदीप कचाटे, मार्गदर्शन व प्रेरणा अमोल जंगले यांची होती. खेड गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, विस्तार अधिकारी नंदा पवार, गडदचे सरपंच, उपसरपंच, शालेय समिती अध्यक्ष व इतर ग्रामस्थ यांनी सर्वांचे कौतुक केले.
PAT24B01940

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com