पाईट येथे घरे, पॉली हाऊस, आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान

पाईट येथे घरे, पॉली हाऊस, आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान

पाईट, ता. १५ : पाईट (ता. खेड) येथे मंगळवारी (ता. १४) सायंकाळी साडे चारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पाईट व परिसरातील वाड्या वस्त्यांवरील आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात आंबे गळून पडले आहेत. चिखलवाडी रस्त्यावरील चैतन्य व नंदू शिंदे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. घरात कोणीही नसल्याने जीवितहानी मात्र टळली. तसेच इतरही अनेक ठिकाणी घरे, गोठे, पडवीवरील पत्रे उडून गेली आहेत.

कावडे वस्तीवरील नितीन कावडे यांच्या पॉली हाउसचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून एक पॉली हाऊस जमीनदोस्त झाले असून दुसऱ्याचे छप्पर उडाले आहे. पाईट परिसरात जोरदार वादळी वारे झाल्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले असून वीजपुरवठा अनेक तास खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून पुरवठा पूर्ववत केला आहे.

अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने आंबोली फिडर बंद पडले. पावसामुळे परिसरातील वीटभट्टीतील तयार विटा मोठ्या प्रमाणावर भिजल्या आहेत. या सर्व नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com