रासे सोसायटीच्या चेअरमनपदी वसंत मुंगसे

रासे सोसायटीच्या चेअरमनपदी वसंत मुंगसे

Published on

पाईट, ता. ३ : रासे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी वसंत दगडू मुंगसे यांची बहुमताने तर व्हाइस चेअरमनपदाकरिता संगीता वसंत डुंबरे यांची पुन्हा बिनविरोध निवड केली आहे.
सदर निवडीसाठी राजगुरूनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन केले होते. यापूर्वीचे चेअरमन विजय रघुनाथ शिंदे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. तर, व्हाईस चेअरमन पदाकरिता संगीता डुंबरे यांना पुन्हा या पदावर संधी देत संचालक मंडळाने त्यांची निवड बिनविरोध केली.
चेअरमन पदासाठी वसंत दगडू मुंगसे व माणिक दगडू डावरे असे दोघांचे अर्ज सादर झाल्याने दोन्ही पदासाठी मतदान झाले. त्यामध्ये
वसंत मुंगसे यांची बहुमताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. बगाटे यांनी जाहीर केले. निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. बगाटे यांना संस्थेचे सचिव बाजीराव थिगळे यांनी कामकाजात साहाय्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.