किसान कार्डसाठी पाईटमध्ये अभियान

किसान कार्डसाठी पाईटमध्ये अभियान
Published on

पाईट, ता. १८ : पाईट परिसरातील (ता.खेड) शेतकऱ्यांसाठी मोफत किसान कार्ड नोंदणी अभियान ग्रामपंचायत कार्यालय राबविण्यात आले. बॉश इंडिया फाउंडेशन, दरेकर सोशल फाउंडेशन, मंडल अधिकारी पाईट व ग्रामपंचायतीतर्फे तीन दिवशीय शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये सुमारे ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
पाईट, रौंधळवाडी, आहिरे, तोरणे, परळे, हेद्रुज, बच्चेवाडी, अनावळे, पाळू, कासारी, सुपे, आडगाव, धामणे, कुरकुंडी, आसखेड, तोरणे बुद्रुक, टेकवडी, वाघू व इतर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी तिरुपती गवळी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक हिरामण रौंधळ, पंडित रौंधळ, गुलाब खेंगले, युवराज बंदावने, विजय करंडे, सरपंच मंगल भांगे, बबन खेंगले, माणिक क्षीरसागर, नीलेश मांजरे, बाळासाहेब पापळ, नंदू डांगले व इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, शिबिर यशस्वी होण्यासाठी बॉश इंडिया फाउंडेशनचे प्रतिनिधी रोहित बलुरे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, पाईट मंडल अधिकारी मनीषा सुतार, ग्रामविकास अधिकारी अनिल फुलपगार आदींनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com