खेड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी वैभव कर्वे

खेड बार असोसिएशनच्या
अध्यक्षपदी वैभव कर्वे
Published on

पाईट, ता. ३० ः खेड तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. वैभव बंडोपंत कर्वे तर उपाध्यक्षपदी अॅड. कोंडीभाऊ बापू कोबल व अॅड. स्वरूपा दशरथ कोतवाल यांची प्रचंड बहुमताने निवड झाली.

सन २०२५-२६ सालाकरिता खेड तालुका बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, दोन सचिव, खजिनदार, लोकल ऑडिटर, चार सदस्य पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. अत्यंत चुरशीच्या झालेली ही निवडणूक प्रक्रिया जिल्हा सत्र न्यायालयाच्या खेड बार असोसिएशनच्या लायब्ररीमध्ये पार पडली. त्यात बहुमताने निवडून आलेले उमेदवार व कंसात मिळालेली मते पुढीलप्रमाणे ः अध्यक्ष ॲड. वैभव बंडोपंत कर्वे (३५४), उपाध्यक्ष अॅड. कोंडीभाऊ बापू कोबल (२७३), अॅड. स्वरूपा दशरथ कोतवाल (३१६), सचिव अॅड. शुभम बाळासाहेब गाडगे (३१७), अॅड. नवनाथ भुजंग कड (३२०), खजिनदार अॅड. शारदा आनंदा राक्षे (३८१), लोकल एडिटर अॅड. केदार लक्ष्मण गुरव (बिनविरोध), सदस्यपदी अॅड. सिद्धिका शिवाजी लांडगे (४३२), अॅड.सूरज अनिल राळे (४२०),
अॅड. दीपक रामदास थिगळे (४६२) ⁠आणि अॅड. संकेत राजेंद्र वाघमारे (४४९) यांचा समावेश आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. ज्ञानेश्वर रोडे, ॲड. मिलिंद रोडे, ॲड. प्रदीप उमाप, ॲड. दीपक चौधरी, ॲड. देविदास शिंदे, ॲड. अतिक सय्यद, ॲड. नीलेश देशमुख, ॲड. राहुल वाडेकर, ॲड. ललित नवले, ॲॅड. रेश्मा भोर, ॲड. आरती टाकळकर, ॲड. आरती कोहिणकर, ॲड. सूरज नंदकर, ॲड. आकाश कोतवाल, ॲड. मोनिका निकम आदींनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com